जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत I सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसताहेत II
06 September, 2010
Speak up…Write out
येथे चौकशी करावी
- ३१ ऒक्टोबर - मेधा कुळकर्णी
आजोबांना त्यांचा जुना रेडिओ दुरुस्त करून हवा होता. नेहमीच्या रिपेअरवाल्याने ते जमणार नाही म्हणून सांगितलं. नातीने पटकन "जस्ट डायल"ला फ़ोन लावला आणि परिसरातल्या पाच-सहा रेडिओ दुरुस्तीवाल्यांचे नंबर मिळवले. आजोबांचं काम एका कॊलमध्ये होऊन गेलं. उपकरणांच्या दुरुस्त्या करणारे, घराला लागणार्या सेवा पुरवणारे, खरेदीसाठी योग्य दुकान, खादाडीसाठी हॊटेल्स, तयार वस्तू पुरवणारे वगैरे वगैरे वगैरे ...."जस्ट डायल" चा फ़ोन फ़िरवला की हवी ती माहिती तुमच्या मोबाइलमध्ये एस एम एसच्या किंवा संगणकात इ मेलच्या रूपात हजर. फ़ोन नंबर, पत्ते लिहून घेण्याचाही त्रास नको. अलिकडे तर "जस्ट डायल"वाले आपल्याला हव्या असणार्या सेवेला आपला फ़ोन थेट जोडूनच देतात. म्हणजे पुन्हा दुसर्यांदा फ़ोन करण्याचा व्यापही नको. खरोखरच एका कॊलमध्ये काम.
"जस्ट डायल"मधून उपकरण दुरुस्ती किंवा दुकान किंवा हॊटेल, थिएटर यांची माहिती मिळणं ठीक. लाडू, चकल्या, चिवडा हे पदार्थ मिळणंही ठीकच. पण हॊस्टेलवर राहणारी भाची सांगत होती की गणेश चतुर्थीच्या दिवशी तिच्या मैत्रिणींना उकडीचे मोदक खायची इच्छा झाली. पण त्या इच्छापूर्तीसाठी अभ्यास सोडून, ट्रेन-बस-रिक्षा असा प्रवास करत कुणा नातेवाइकाच्या किंवा अगदी स्वतःच्यासुद्धा घरी जाणं परवडण्यासारखं नव्हतं. हॊस्टेलच्या परिसरात उकडीचे मोदक करून देणारं कोणी भेटलं नाही. मग माहिती काढण्याचा हमखास मार्ग म्हणजे "जस्ट डायल". पण उकडीच्या मोदकांसारखा खास घरगुती पदार्थ करून देणार्याची, खर तर देणारीची माहिती तिथे मिळेल? भाचीने चौकशी केली आणि चक्क केतकर नावाच्या उकडीचे मोदक करून देणार्या बाई सापडल्या. ऒर्डर दिली. संध्याकाळी हॊस्टेलवर छानपैकी उकडीच्या मोदकांची पार्टी झाली. यंदा दिवाळीच्या फ़राळाचे जिन्नस अनेक मैत्रिणींनी "जस्ट डायल"वरूनच बुक केल्याचं कळलं. यात विशेष काहीच वाटलं नाही.
हे सगळं सुरु कसं झालं? व्ही एस एस मणी हे "जस्ट डायल"चे जनक. टेलिफ़ोन डिरेक्टरीसाठी यलो पेजेस तयार करणार्या कंपनीत मणी नोकरी करत होते. तिथे एका गिर्हाइकाबरोबर झालेल्या चर्चेतून ग्राहकांनी डायल केल्याबरोबर त्यांना सेवा आणि वस्तू यांची माहिती चोविस तास पुरवणार्या सर्च इंजिनची कल्पना त्यांना सुचली. आणि मणी कामाला लागले. "जस्ट डायल"ची सुरुवात १९९२च्या सुमारास झाली खरी. पण लगेचच ते बंद पडलं. माहितीतंत्रज्ञानाच्या प्रभावाचा काळ अजून यायचा होता. एका लॆंड फ़ोन कनेक्शनसाठी वर्षानुवर्ष तिष्ठत राहण्याचा तो काळ. मोबाइल यायचाच होता. त्यामुळे मणी यांची माहिती देणार्या या सर्च इंजिनची कल्पना लोकांच्या पचनी पडली नाही. पुढे १९९२ ते ९६ या काळात मणी यांनी या कल्पनेवर खूप काम केलं आणि १९९६ मध्ये आता आहे त्या स्वरुपातलं "जस्ट डायल" सुरू झालं. सुरू करण्यासाठी मणी यांनी वापरलेलं भांडवल होतं उधार उसनवार मिळवलेलं फ़र्निचर, भाड्याने आणलेले संगणक, भाड्यावरच घेतलेली एका गॆरेजमधली दहा बाय तीस ची जागा आणि पनास हजार रुपये...बस्स. ग्राहक आणि त्यांना सेवा देणारे यांचा मेळ घालून दोघांचाही; आणि स्वतःचा, म्हणजे "जस्ट डायल" चा फ़ायदा करून देणारं हे एक बिझिनेस मॊडेल बनलं. आपल्या सेवेतून माहिती मिळवणार्या एकाही ग्राहकाला आपला फ़ोन नंबर आठवत नाही असं व्हायला नको असं मणी यांचं म्हणणं होतं. म्हणूनच तर "जस्ट डायल"चा स्थानिक नंबर २२८८८८८८ आणि राष्ट्रीय नंबर ३९९९९९९९ हा आहे. विसरभोळ्यांच्यासुद्धा सहजच आठवणीत राहू शकणारा.
आज "जस्ट डायल"ची उलाढाल पाचशे कोटींच्यावर गेली आहे. दर वर्षीची मिळकत शंभर कोटींच्या पुढे आहे. भारतातल्या २४० शहरांत ही सेवा उपलब्ध आहे. इथे दररोज वीस लाखाहून अधिक फ़ोनकॊल्सना उत्तरं दिली जातात. याखेरीज "जस्ट डायल"च्या वेबसाइटमधून, मोबाइल-एस एम एस सेवेतून माहिती मिळवणारे लाखो लोक आहेतच. "जस्ट डायल"ने आता उत्तर अमेरिकेत स्थानिक सर्च इंजिन सुरू केलं आहे.
नवतंत्रज्ञानाच्या युगात "जस्ट डायल"सारखी सेवा निर्माण होणं अपरिहार्यच होतं. ग्राहकांना हवी ती माहिती वेगाने आणि विनासायास उपलब्ध होणं हे तर इथे घडतं आहेच. अशा सेवांमुळे टेलिफ़ोनची छापील डिरेक्टरी इतिहासजमा झाली आहे. आपल्याला हवा असलेला पत्ता, फ़ोन नंबर आपल्या मोबाइलमध्येच येऊन पोचला की लगेच फ़ोन लावणं, ती माहिती साठवून ठेवणं हे सगळं आपोआपच होतं. ग्राहक म्हणून आपल्याला सुखावणारं आणखी एक या "जस्ट डायल"मध्ये घडतं. आपण "जस्ट डायल"ला जेव्हा दुसर्यांदा फ़ोन करतो तेव्हा तिथली फ़ोन घेणारी व्यक्ती चक्क आपलं नाव घेऊन बोलायला सुरुवात करते. म्हणजे आपण त्यांना जेव्हा पहिल्यांदा फ़ोन केलेला असतो तेव्हा तिथे आपलं नाव, आपला फ़ोन नंबर, इ मेल आय डी अशी सगळी माहिती नोंदवली गेलेली असते. आणि पुढच्या प्रत्येक खेपेला ती वापरली जाते. ग्राहकाचा रुबाब यामुळे वाढतो.
"जस्ट डायल"मध्ये आणखीही काही आहे. इथे नोंदवल्या जाणार्या माहितीचा अभ्यास केल्यावर जाणवतं की नव्याने व्यवसाय सुरू करणार्यांची गर्दी जास्त आहे. उद्योगिनी स्त्रियांची तिथली वाढती नोंदणी हे उद्योग-धंद्याच्या क्षेत्रात स्त्रियांची दमदार वाटचाल सुरू असल्याचं लक्षण आहे. पाळणाघर, ब्युटी पार्लर चालवणार्या, शिकवण्या घेणार्या, घरगुती वस्तूंची विक्री करणार्या स्त्रियांना अधिकाधिक लोकांपर्यंत पोचण्यासाठी, आपला व्यवसाय वाढवण्यासाठी "जस्ट डायल"सारखी सेवा मदतकारक ठेरली आहे. तिथे नाव नोंदवणारे सांगतात की व्यवसाय सुरू केल्यानंतर सुरुवातीच्या काळात या सेवेचा खूपच उपयोग होतो. तंत्रज्ञान सामान्य माणसाचं बळ कसं वाढवतं त्याचं "जस्ट डायल" हे उदाहरण आहे.
दिवाळीलाइक अशी सुरू झाली- एक कूsssल स्टोरी
१० ऒक्टो.
सन २०२० मध्ये जगातल्या तिसर्या पिढितल्या अमेरिकास्थित ग्लोबल मराठी(?) मुला-मुलींच्या इंग्राठी भाषेत ही कथा अशी सांगितली जाईल का?
एक कूssssल किंग होता....राजा... यु नो? तो एकदम.. लाइक पॊप्युलर होता. पीपलचा आवडता राजा. त्याचं नाव राम....यु नो? कूssल गाय...ओल्ड फ़ॆशन बट कूssल नेम... यु नो?...याsss सेssम...लाइक गॊडचं नाव... राssम. त्याला एक स्टेपमॊम होती. यु नो?...त्याच्या डॆडची सेकंड की थर्ड वाइफ़. नो किडिंग. यु नो? ओल्ड फ़ॆशन मॆरेजिस्. तिने तिच्या हजबंडला... यु नो ...रामच्या डॆडला फ़ोर्स केलं की रामला जंगलात पाठवा. यु नो?...सम ओल्ड फ़ॆशन वर्ड ...अ..भ...या...रण्य...? आउटडेटेड मराठी लिंगो यु नो? नॆशनल फ़ॊरेस्टलाइक. पुअर कूssल गाय... तो राम जंगलात गेला. त्याला त्याच्या वाइफ़ने आणि ब्रदरने कंपनी दिली...आफ़्टरऒल तो खूssप दिवस जंगलात राहणार होता. मग तो बोअर झाला असता ना म्हणून! मग दीज थ्री पीपल डिसायडेड टु चिल आउट टुगेदर इन जंगल. कूssल आयडिया ना?
पण शीट् ! जंगल सॊ्ल्लि्ड्ड हॊरिबल होतं. मोठे मोठे डेव्हिल्स...यु नो राक्षसाज्..होते तिकडे. आणि मंकीजपण. पण राम वॊज रीssअल ब्रेssव्ह यु नो? त्याने त्याच्या "बो"ने आणि "ऎरो"ने सगळ्यांना पळवून लावलं...कूsssल ना? ओल्ड फ़ॆशन वॊर ..यु नो?
पण फ़ॊरेस्टमध्ये ना; देअर वेअर गॆंगस्टर बॊइज....सम रावणलाइक... यु नो? धिस गॆंगस्टर गाय रावण वॊज सो कृएल यु नो? ही पिक्ड अप बेब सीता...लाइक हिज वाइफ़...हिज मिन्स रामची वाइफ़. नो किडिंग..! आय नो स्टोरी इज लिट्ल कन्फ़्युजिंग...लाइक यु नो?
बट अवर कूssल बॊय राम आणि त्याचा तो ब्रदर लक्ष्मणलाइक...दे वेअर सोsss मच ब्रेssव्ह यु नो? लक्ष्मण...लाइक ओल्ड फ़ॆशन नेम यु नो? यु कॆन कॊल हिम "लक्स" ओके? मग ते रावणाबरोबर वॊर खेळले. रावण....यु अंडरस्टॆंड? डोन्ट कॊल हिम बाय एनी अदर नेम. पुढच्या स्टोरीत रावण नाहीच. एनिवेज्...वोरमध्ये राम, लक्स, हनी यांच्या हेल्पला खूप सारे गॊड्सपण आले. मंकीजची आर्मीपण होती. कूsssल आयडिया ना? मंकीजना ट्रेनिंग दिलेलं. कोणी? नो मोअर क्वेश्चन्स प्लीज. गॊड्स काय पणलाइक करू शकतात; यु नो? स्टोरी सांगू की नको? हां....सो... नो किडिंग. एक हनुमान नावाचा जायंट मंकी पण होता. नॊट हनिमुन. नो जोक्स प्लीज. ह...नु...मा..न. ओकीज्....यु कॆन कॊल हिम "हनी"....यु नो...ओबामाज् गॊड. ही कम्स राइट फ़्रॊम जंगल टु यु एस.
एनिवेsज् दीज गायीज् राम, लक्ष्मण, हनुमान यांनी वॊर केलं. ते जिंकले. सीता...यु कॆन कॊल हर स्वीटी ओके? सो शी केम बॆक टु जंगल. कूssल ना?
त्यांचा जंगलात टाइम अपलाइक झालेला. ते खूप बोअर झालेले. जंगलात टीव्ही नाही, नेट कनेक्शन नाही, मोबाइलची रेंज नाही, मॊल्स नाहीत...शीट् ! बोअरिंग. मग दे डिसायडेड टु राइड बॆक होम. आता खूप ईयर्सनंतर बॆक होम. तर सेलिब्रेशनलाइक पाहिजे ना! यु नो त्या काळी बार, क्लब नव्हते. सो कान्ट टेक आउट देम टु ड्रिंक ना! पण कायतरी सेलिब्रेट तर करायलाच पाहिजे. आपले ग्रॆंडपा यु एस ला आले की आपण करतो. आपण इंडियात गेलो की ते करतात. दीज् गायीज् राम, स्वीटी, लक्स.. फ़ॊरेस्टमधून आलेले ना! कूsssल.
मग त्यांनी स्वीट्स बनवले. त्यांच्याकडे खूप लॆम्प्स होते. ते त्यांनी लावले. प्रेटी कूल ना? त्यांनी फ़ायरवर्क्सलाइक केलं. ऒर्केस्ट्रा वाजवला. डान्सपण केला. कूsssल. चार जुलैला यु एस डे ला करतात...लाइक दॆट. पण यु नो? ओल्ड स्टाइल...मोअर कलर्स आणि स्टफ़...सोsss कूsssल. तर तेव्हापासून हे दिवाळी फ़ेस्टिवललाइक सुरू झालं. रिअल्लीsss...माझ्या डॆडच्या डॆडच्या डॆडनी सांगितली ही स्टोरी. नो किडिंग...
जुने जाउद्या...
१९ सप्टेंबर ०९ -
जुने जाउद्या...
व्यक्ती बदलतात किंवा व्यक्तींना बदलावं लागतं तसंच संस्थांचंही होतं. कोण्या एके काळी जी उद्दिष्ट घेऊन संस्था सुरू केल्या जातात, संस्थांमार्फ़त जी कामं सुरू केली जातात ती कालांतराने कालसुसंगत राहिली नाहीत असं होतं. हे ध्यानात आलं की उद्दिष्ट तपासून कामाची पुनर्र्चना करण्याचे प्रयत्न सुरू केले जातात. हे सगळं सोपं नसतं. मुळात बदललेल्या जगाचं आकलन नेमकेपणाने होणं महत्वाचं असतं. एका विशिष्ट रीतीने विचार आणि काम करायची सवय झालेली असते. ही सवयही बदलावी लागतेच. कामाची, संवाद-संपर्काची साधनं नवनवी साधनं, माध्यमं येत जातात. भाषा, शैली हे ही जुनं होत जातं. लोकांना, नव्या पिढीला आकर्षून घेणारा कार्यक्रम लागतो....वगैरे वगैरे.
ग्रंथाली या संस्थेचं उदाहरण घेऊनच हे सगळं समजून घेऊया. आत्ता पन्नाशीच्या अलिकडे-पलिकडे असलेल्या वाचन, सामाजिक चळवळींकडे ओढा असलेल्या मुंबई-पुण्यातल्या माझ्यासारख्या अनेकांचं ग्रंथालीशी भावनिक, वैचारिक नातं आहे. ग्रंथाली ही रूढार्थाने संस्था नव्हतीच. वाचक चळवळ याच नावाने ती सर्वपरिचित होती. आताच्या भाषेत बोलायचं तर ते एक नेटवर्क होतं. पुस्तकप्रेमी, समाजस्नेही, कृतीवादी तरुणांचं नेटवर्क. महाराष्ट्रातल्या सर्व चळवळींचं ग्रंथाली हे ऒर्कुट होतं. नव्याचं स्वागत आणि कौतुक करणारी, मुख्य प्रवाहाच्या बाहेरच्या धारांना मानाचं स्थान देणारी ही चळवळ सुरू झाल्यापासून पंधराएक वर्ष जोमात होती. काळाशी सांधा जोडून होती. पुढे काय झालं?
ग्रंथालीची चाकं नव्या काळाच्या रस्त्यावरून चालवण्याच्या प्रयत्नात असलेले संस्थेचे तरुण विश्वस्त धनंजय गांगल यांच्याशी संस्थेच्या नवं-जुनं असण्याची चर्चा केली. १९९२-९३ पासून धनंजय ग्रंथालीसोबत काम करत आहेत. आय आय टीतून इंजिनिअर झालेले आणि कॊम्प्युटर सॊफ़्ट्वेअरचा व्यवसाय करणारे धनंजय बदलणार्या जगाचा संदर्भ जराही सुटू न देता विचार करतात. ते म्हणतात - "पूर्वी आतासारखी माध्यमांची गर्दी नव्हती. महाराष्ट्रात जे नवं घडत होतं त्याला एक प्लॆटफ़ॊर्म हवा होता. तो ग्रंथालीने उपलब्ध करून दिला. ग्रंथाली मुळात युवकांच्या, स्त्रियांच्या, दलितांच्या चळवळींनीच घडवली, आकाराला आणली. पुस्तकं छापणं हे ग्रंथालीचं मुख्य काम कधीच नव्हतं. ग्रंथालीसाठी पुस्तकं हे लोकांपर्यंत पोचण्याचं एक साधन होतं. चळवळ आणि प्रकाशन व्यवसाय याचं हे एक कॊम्बिनेशन होतं. आणि तेच ग्रंथालीचं बळ होतं. पण हे मॊडेल आर्थिक दृष्ट्या यशस्वी होऊ शकलं नाही. आणि भांडवल मिळवण्यासाठी ग्रंथाली पुस्तक छापत राहिली."
कोणतंही काम टिकून राहण्यासाठी आणि ते वाढण्यासाठी ते एक बिझिनेस मॊडेल म्हणून यशस्वी होण्याची गरज असते. कामाला पैसा लागतो आणि माणसं लागतात. स्वयंस्फ़ूर्तीने काम करणारी माणसं पैशाची कसरसुद्धा भरून काढू शकतात. जागतिकीकरणामुळे सुरू झालेल्या बदलांचा एक अटळ परिणाम चळवळीकडे स्वतःहून येणारा माणसांचा ओघ आटण्यात झाला. नोकर्या, उद्योग-धंदे या क्षेत्रात बदल होत होते, मध्यमवर्गाला सुखासीनतेची ओढ लागली होती, आर्थिक क्षेत्रात खाजगीकरण वरचढ होत चाललं होतं, बाजाराची सत्ता प्रस्थापित होत होती, चॆनल्सचा जमाना सुरू झाला होता, इंटरनेटने माहितीचं महाद्वार सर्वांसाठी उघडलं होतं. काळ वेगाने बदलत चालला होता. ग्रंथाली कुठे होती?
धनंजय सांगतात - "ग्रंथाली पुस्तकं छापण्यातच रमली होती. जगात होत असलेले बदल समजून घेण्याऎवजी आपण करत आहोत तेच कसं योग्य आहे असाच दॄष्टिकोन होता. एकूणच बदललेल्या जगाला हीन समजलं जायचं, तुच्छ लेखलं जायचं. एक वाचन तेवढं काय ते महान आणि बाकी चॆनल्स वगैरे सगळं घाण असा पवित्रा असायचा. पण याच काळात वॄत्तपत्रांची, मराठी वॄत्तपत्रांची संख्या वाढत चालली होती. महिना तीनशे रुपयात तीन -चार वॄत्तपत्र, तेवढ्याच पैशात शेकडो चॆनल्स मिळू लागली. यातून घरबसल्या माहिती आणि मनोरंजन भरपूर सुरू झालं. लोकांना घराबाहेर पडण्याची गरज वाटेनाशी झाली. नोकरीच्या ठिकाणी कामाच्या वेळा वाढल्याने कार्यकर्त्यांना सामाजिक -सांस्कॄतिक उपक्रमांसाठी वेळ काढणं कठीण होऊ लागलं. दुसरीकडे सामाजिक चळवळी थंड होत गेल्या. आणि याच काळात लोकांपर्यंत, विशेषतः तरुण पिढीपर्यंत पोचणारं माध्यम येऊन थडकलं - इंटरनेट. ग्रंथाली या सगळ्या वातावरणात मागे पडत गेली."
आता ग्रंथालीचं ’रुची’ हे मासिक इमेलवरून पंधरा हजार वाचकांपर्यंत पोचतं. बॄहनमहाराष्ट्र अधिवेशनातून ग्रंथाली महाराष्ट्रा-भारताबाहेरच्या मराठी वाचकांपर्यंत पोचते. जनसंवाद सारख्या कार्यक्रमांमधून नव्या रीतीने चळवळ उभी करण्याचा प्रयत्नही सुरू आहे. ग्रंथाली ज्या संक्रमणातून गेली, जे पेच तिने अनुभवले त्याच परिस्थितीतून सगळ्याच सामाजिक - सांस्कॄतिक संस्थांना जावं लागलं आहे. आजच्या काळात जुन्या पद्धतीने संस्था चालवून भागणार नाही. आपापल्या सुरक्षित घरट्यांमधून बाहेर पडावंच लागेल. खुल्या मनाने नव्याला सामोरं जावंच लागेल. ग्रंथाली थंडावल्याचं वैषम्य अशासाठी की ती त्या जुन्या काळातही नव्या पद्धतीने, खुल्या विचारानेच काम करत होती. अगदी १९९०-९२ मध्येही ग्रामीण-शहरी मराठी नवसाक्षर वाचकांसाठी कोणत्या प्रकारची साहित्यनिर्मिती व्हावी याचा शोध घेण्याचा प्रयत्न ग्रंथालीने केला होता. हे नक्कीच नवं होतं. तरीही कालसुसंगत राहण्यात ती मागे पडत गेली. नवं तंत्रज्ञान वापरता आलं नाही हे त्याचं कारण नक्कीच नाही. नव्या तंत्रज्ञा्नातूनही लोकांना नेमकं काय द्यायचं, त्याहीआधी लोकांना नेमकं काय हवं आहे हे समजण्यातली कमतरता हेच मागे पडण्याचं कारण असणार. हा सगळा पेच, गुंता सोपा नाहीच. तो सोडवणं कोणा एका-दोघांच्या हातातही नाहीच. धनंजय किंवा आणखी तरुण मंडळींना याचं नीट आकलन होऊ शकतं. आणि त्यांच्या प्रयत्नांमधूनच आजच्या काळातलं ग्रंथालीचं ऒर्कुट शोधायला मदत होऊ शकते.
- मेधा कुळकर्णी

नैरोबी मुक्कामी चर्चा शहरी आरोग्याची
अमेरिकन भेळ आणि पनीर पिझ्झा
१२ डिसें ०९
अमेरिकन भेळ आणि पनीर पिझ्झा
पंचतारांकित हॉटेलातला हा ग्राहक – वेटर संवाद -
काय घेणार? चहा, कॉफ़ी, मिलो, चॉकलेट की ज्युस?
चहा.
ओके. कोणता चहा? हर्बल, मसाला, ग्रीन, आइस की बुश?
मसाला.
ओके. ब्लॅक की दूध घातलेला?
दूध पावडर की लिक्विड दूध?
लिक्विड दूध.
ओके. गायीचं की म्हशीचं?
गायीचं दूध.
थंड की गरम?
गरम.
ठीक. साखर की मध की शुगर फ़्री?
साखर.
बीट साखर की उसाची साखर?
उसाची.
ओके. व्हाइट की ब्राउन ?
चहाचं राहुदे. मी पाणीच घीईन.
साधं की मिनरल?
मिनरल.
थंड की साधं?
...........! ! !
आता हा रस्त्यावरच्या भेळवाल्याकडचा संवाद –
क्या बनाउ? चाट या भेल?
भेल.
अमेरिकन? की चायनीज?
इंडियन.
कॉर्न? जैन? पनीर?
...........! ! !
तर हॉटेलातल्या वेटरची, भेळवाल्याची प्रश्नमालिका संपतच नाही. पण या प्रश्नमालिकेतून लक्षात येतं की खाद्य आणि पेय पदार्थांचे भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. साध्या चहाचे एवढे प्रकार. आणि उत्तरेकडची भेळ एकदम ग्लोबलच होऊन गेली आहे की!
ग्लोबलायजेशन म्हणजे अमेरिकनायजेशन किंवा अमेरिकेचा नवसाम्राज्यवाद असं एक मत आहे.
जेव्हा विविध देशातल्या शहरा-शहरात एकाच पद्धतीचे मॉल्स उभे राहतात, त्या मॉल्समध्ये एकाच प्रकारच्या वस्तू मिळतात आणि त्यापैकी जास्तीत जास्त ब्रॅंड्स अमेरिकन असतात तेव्हा ग्लोबलायजेशनचा चेहरा आणि मेकअप अमेरिकन, कपडे आणि परफ्युम अमेरिकन, खाद्यपदार्थ आणि जिभेची चवसुद्धा अमेरिकनच असते. पण हळुहळु हे बदलायला लागलं.
जागितिकीकरण मोठ्या शहरांकडून छोट्या शहरांकडे सरकू लागलं आणि मूठभरांकडून सर्वसामान्यांपर्यंत जाऊन जसं पोचलं तसं स्थानिकाची मोहर या ग्लोबलायजेशनवर उमटू लागली.
एक गंमतीदार, खाद्यपदार्थाचं उदाहरण द्यायचं तर सध्या जगभर तरुणांचा सर्वाधिक आवडता पिझ्झा कसा बदलत जातो ते बघू. मॅकडोनाल्डमधून प्रथम अमेरिकेत आणि नंतर जगात अवतरलेला हा पदार्थ आता मुळीच अमेरिकन राहिलेला नाही. आपल्याकडचा पनीर पिझ्झा म्हणजे तर पिझ्झ्याचा शंभर टक्के भारतीय (खरं तर पंजाबी; पण पंजाबीलाच भारतीय समजलं जातं, ना?) अवतार. तमीळनाडूत सांबार पिझ्झाही मिळू लागलाय म्हणे. महाराष्ट्र देशी थालीपीठ पिझ्झा मिळायला हरकत नसावी. अमेरिकेत आणि ब्रिटनमध्ये भारतीयांनी चिकन-टिक्का-मसाला पिझ्झा बनवून इंडियन एक्झॉटिक कुझिनमध्ये भर टाकली आहे.
भारतातल्या मॅकडोनाल्डने अमेरिकन पदार्थांचे भारतीय अवतार शोधून काढणं हे ठीकच. पण याहीपुढे जाऊन चक्क न्युयॉर्कमध्ये मॅक-आलु-टिक्की बर्गर मिळणं, केनया सफारीत धिरडं मिळणं किंवा मूळ उत्तरेकडचा भेळ हा पदार्थ दस्तुरखुद्द लखनौमध्ये बंबईकी भेल या नावाने मिळणं म्हणजे ग्लोबलायजेशनचा कहरच; नाहीतर काय?
जेव्हा मॅगीने मसाला नूडल्स बाजारात आणले तेव्हाच नूडल्सचं चिनीपण लयाला गेलं. दाक्षिणात्य दोसा कधीच संकुचित नव्हता. आधीच त्याने भारतात उत्तरेपर्यंत मजल मारली होती. आता तोही ग्लोबल झाला. दोशाने शेजवान दोशात चिनी नूड्ल्सना जागा करून दिली. तो रोस्टेड टोमॅटो दोसा हे विचित्र नाव धारण करायलाही त्याची काही हरकत नाही.
आपल्या सर्वमावेशक धोरणवाल्या पावभाजीने नूडल्सना आपलंसं करून घेतलं आणि ती चायनीज पावभाजी झाली.
भारतीय मोहर आकाशात मिळणार्या खाद्यपदार्थांवरही उमटली आहे. परदेशी विमानकंपन्या विमानप्रवासात चक्क जैन फूडही द्यायला लागल्यात. आणि परदेशी विमानतळांवर पोटॅटो बॉल्स नावाने आपले बटाटेवडेही हजर आहेत. ते खाल्ल्यावर पिण्यासाठी मसाला टी तिथेही आहेच.
भारतीय खाद्यपदार्थ स्वयंपाकगृहाचा उंबरठा ओलांडून ग्लोबल मिडियापर्यंत पोचलेत. भारतीय शेफना सेलिब्रेटी स्टेटस मिळालंय. वाढतं पर्यटन आणि स्थलांतर यामुळे स्थानिक खाद्यपदार्थांचं महात्म्य आणि लोकप्रियताही वाढत चालली आहे. हेच ते ग्लोकलायजेशन.
“द वर्ल्ड इज फ्लॅट” या पुस्तकात थॉमस फ्रीडमनने खाद्यपदार्थांच्या या ग्लोकलायजेशनचं मस्त वर्णन केलं आहे – जागतिकीकरणामुळे सपाट झालेल्या जगासारखाच असतो पिझ्झाबेस, सपाट पाव. त्यावर प्रत्येक देशाने, संस्कृतीने आपापल्या चवींचे, रंग-गंधाचे खाद्यपदार्थ चढवावेत. मग तो पिझ्झा परका राहातच नाही; त्या त्या देशाचा, संस्कृतीचाच होऊन जातो.
मेधा कुळकर्णी